मनोगत

मनोगत

नमस्कार मी रामचंद्र मेस्त्री. मी गेली १३ वर्ष BEST – (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) येथे  बस चालक bus driver म्हणून कार्यरत आहे. पाऊस, थंडी, उकाडा कशाची तमा न बाळगता सतत तुमच्या सेवेत हजर असतो. रोजच्या दैंनदिन आयुष्यात बस चालवताना मला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते, 

मग ती गर्दी असो किंवा ट्रॅफिक.अनेक चांगले -वाईट अनुभव ही येतात. अनेक लोक रोज बसने प्रवास करतात. रोज तोच रस्ता काही नविन तर काही ओळखीचे चेहरे होतात. कुणी बस वेळेवर न आल्याचा राग आमच्यावर  काढतात तर  कुणी वयस्कर, गरोदर, तान्ह्या मुलानंसह पुढून चढून दिल्याबद्दल आभार मानतात.काही  प्रवाशांची दीर्घ चर्चा होते तर काही उद्धटपणे बोलून जातात.

     तरीही मी माझे काम हस्तमुखाने करीत राहतो.सतत बस चालवल्याने मान व पाठ दुखी लागते. ट्रॅफिक आणि प्रदूषणामुळे  मानसिक ताण ,चिडचिड वाढते, मणक्याचे आजार,दमा, उच्च रक्तदाब , दृष्टीविकार अश्या आजारांना ही सामोरे जावे लागते.दसरा असो किंवा दिवाळी आम्ही नेहमी कामावर असतो.

आम्ही लोकांना ठरलेल्या स्थळी वेळेत पोचवतो मात्र आमची  रात्री उशिरा  ड्युटी संपल्यावर आम्हाला  एकही वाहन मिळत नाही पायीच प्रवास करावा लागतो.

       हे सर्व असले तरी नियमांचे पालन करून मी  प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक वापरून सुरक्षित आणि आरामदायी अनुभव मिळावा यासाठी प्रामाणिकपणे परिश्रम करीत राहीन.

🙏🚍 *’लोकसेवा हेच आमचे ध्येय आहे* 🙏🚍’

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow