यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा – सिया आणि दुर्वेश देवरुखकर यांचे यश
कोल्हापूर येथे १६ ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमिक शाळेत ८ व्या तुकडीत शिकणाऱ्या कुमारी सिया देवरुखकर या विद्यार्थिनीने ३ सुवर्ण, ३रौप्य आणि १कांस्यपदके अशी एकूण सात पदके पटकावली.
याचं स्पर्धेत सियाचा लहान भाऊ दुर्वेश देवरूखकर याने १ सुवर्ण आणि २ कांस्य पदके जिंकली आहेत. दुर्वेश हा पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आहे.







