Sharvil Salvi shines at NSKA International Karate Championship 2023 at Kathmandu

Sharvil Salvi shines at NSKA International Karate Championship 2023 at Kathmandu

पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी. त्याला अभ्यास व खेळाची आवड लहानपणापासून आहे. बौद्धिक ज्ञानाबरोबर उत्तम शारीरिक क्षमता ही महत्वाची असते. म्हणूनच इयत्ता पहिली पासून त्याची व्यायामाची सुरवात झाली. पहिली व दुसरी करोना काळात गेल्यामुळे शाळैप्रमाणेच त्याचा व्यायाम ऑनलाईन पध्दतीने चालू झाला. इयत्ता तिसरीत शाळैत प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शर्विल चे कराटे शिक्षण चालू झाले. कराटेचाच एक भाग असणाऱ्या आर्म फायटिंग स्पर्धेत राज्य स्तरावर 1गोल्ड, 1सिल्वर, 1 ब्राॅंझ पदके मिळवत चांगले यश प्राप्त केले. फ्रेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या कराटे स्पर्धेत 1 सिल्वर, 1 ब्राॅंझ व टिम ट्रॉफी मिळवत नेपाळ मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेसाठी स्वतःचे स्थान मुंबई संघात पक्के केले. सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगला सराव करून 25 ते 28 मे 2023 दरम्यान रांगशाल, थालेम, नेपाळ येथे झालेल्या 14 व्या NSKA आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत 1 सिल्वर, 2 ब्राॅंझ पदके मिळवत मुंबई टिम ला 3 उपविजेतेपदाची ट्रॉफी मिळवून दिली. कराटे बरोबर शर्विल ला सायकलिंग, पोहणे, बॅडमिंटन खेळायला ही आवडते. शाळेतही शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना कालेकर व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम करत आहे. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये त्याचा सहभाग असतो. शाळेतील मित्र मैत्रिणींबरोबर  मिळून मिसळून राहायला, त्यांना मदत करायलाही त्याला आवडते. पुढील वाटचालीत त्याने अशीच प्रगती करत चांगला माणूस बनून देशाचे,  शाळेचे नाव ऊंच करावे हीच त्याच्या पालकांची इच्छा आहे.

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow