मराठी मुलांची इंग्रजी झेप
पार्ले टिळक विद्यालय या नामांकित शिक्षणसंस्थेने मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना इंग्रजी भाषा चांगली अवगत व्हावी या हेतूने Functional English Course हा आगळा वेगळा उपक्रम सुरु केला. या उपक्रमासाठी एक विशिष्ट अभ्यासक्रम तयार केला असून तो इयत्ता ३री ते ८ वी असा ६ वर्षांचा आहे. संस्थेच्या २ मराठी शाळांमध्ये तसेच महाराष्ट्रातल्या २० हुन अधिक शाळांमध्ये हा उपक्रम चालू आहे. आजमितीस २०००० हुन अधिक मराठी मुलांनी याचा लाभ घेतला असून इंग्रजी भाषा चांगली आत्मसात केल्याने त्यांचा आत्मविश्वासही झाली आहे.
अशा वरील उपक्रमास २५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने २० जानेवारी रोजी संस्थेच्या केशवराव घैसास सभागृहात एक हृद्य सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी ब्रिटिश कौंसिल (परीक्षा ) यांच्या पश्चिम विभागाचे प्रमुख राजेश भोजनीं होते. प्रथम या उपक्र,याची संपूर्ण माहिती देणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल गानू यांनी इंग्रजी भाषेचे महत्व सांगितले. इंग्रजी अजूनही एक जागतिक भाषा असून इतरांशी संवाद साधण्यासाठी ती चांगली येणे आवश्यक आहे व हे हेरूनच २५ वर्षांपूर्वी संस्थेने हा उपक्रम सुरु केला. अध्यक्ष श्री. राजेश भोजनीं यांनी इंग्रजी भाषेत चांगले लिहिणाऱ्याला सध्या जागतिक मागणी आहे तर आर्थिक दृष्ट्याही इंग्रजी येणाऱ्याला जास्त पैसे मिळतात असे प्रतिपादन केले.
या उपक्रमाच्या प्रमुख व संस्थेने ज्यांच्या साहाय्याने हा उपक्रम सुरु केला त्या मीनल परांजपे यांनी आपल्या २५ वर्षातील काही आठवणी कथन केल्या. यानंतर संस्थेतर्फे मीनल परांजपे यांच्या विशेष योगदानाबद्दल तसेच या उपक्रमात साथ देणाऱ्या सर्वांचा पुष्पगुछ व स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला.





