Aashadhi Ekadashi Celebration ….अवघ्या PTVEMS चे पंढरपूर झाले….

Aashadhi Ekadashi Celebration ….अवघ्या PTVEMS चे पंढरपूर झाले….

PTV EMS PRI celebrates Aashadhi Ekadashi ….अवघ्या PTVEMS चे पंढरपूर झाले….
याची डोळा तेथे विठ्ठल रखुमाई पाहिले …

ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 
ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम …
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई,
एकनाथ नामदेव तुकाराम…

विठूच्या गजर हरिनामाचा झेंडा रोविला…
वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला…

तीर्थ विठ्ठल , क्षेत्र विठ्ठल,
देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल….

माझे माहेर पंढरी, 
आहे भीमरेच्या तीरी…

अवघे गरजे पंढरपूर…अवघे गरजे पंढरपूर 
… चालला नामाचा गजर, चालला नामाचा…

पंढरपूरच्या आषाढीवारीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात फार मोठे महत्व आहे. आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या 
वारकऱ्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रच विठूनामाच्या रंगात रंगून जातो. 
प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नसले तरी त्यातला भक्तीभाव सर्वांना ओढ लावणारा असतो. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक ठेवा 
लहानग्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्यात भक्तिभाव रुजावा म्हणून PTVEMS शाळेत प्रत्येक वर्षी एक छोटेखानी पालखी सोहळा साजरा केला जातो. या वर्षीसुद्धा शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तिने एका पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. अभंग आणि विठूनामाच्या गजराने संपूर्ण शाळाच भक्तिमय झाली.

Ashadhi Ekadashi Celebration 2019

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow