Women’s day special Roll of a Sister

Women’s day special Roll of a Sister

ह्या जगात आई नंतर दुसरी तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारी कोणी असेल तर ती म्हणजे तुमची बहीण. 

माझे नाव तनिष आहे  आणि मला ही एक बहीण आहे जिचे नाव आरोही आहे. जरी आम्ही जुळे बहीण भाऊ असलो तरीही माझ्यापेक्षा ती काही मिनिटानी छोटी आहे. मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो कारण मला बहिणीच्या रुपात एक सुख दुःखाचा साथीदार आहे. माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच प्रेम करणारी माझी ताई आहे.

कधी मी चुकलो तर आई बाबापासून मला नेहमी वाचवते आणि स्वतःहा चुकली तर मला लगेच sorry बोलते. माझी लाडकी बहीण स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करते. कोणी काही खाऊ दिला तर हक्काने माझ्यासाठी राखून ठेवते. माझ्या गुणाचे तोंडभर कौतुक पण करते, आणि माझ्या अवगुणांवर मला दम पण भरते.

अभ्यासात ती माझ्यापेक्षा हुशार आहे. 

माझी वह्या पुस्तके ती वेळापत्रकानुसार व्यवस्थित भरते. मी दररोजचा अभ्यास केला आहे की नाही हे आवर्जून पाहत असते.

शाळेत सगळ्यांना “ माझा भाऊ” म्हणून ओळख करून देते. मला कोणी दम भरला तर पूढे जाऊन हीच दादागिरी करते. 

लहानपणीची एक गोष्ट सांगायला गेली तर तिला आंबा खूप खायला आवडतो आणि आंबा मला देखील खूप आवडतो. गावाला गेल्यावर आमची नेहमी आंबे खाण्यावरून शर्यत असायची व माझ्यापेक्षा तीच जास्त आंबे खायची.

अशीही माझी प्रेमळ जिवाला- जीव लावणारी छोटी बहीण. आमच्या ह्या नात्याला कुणाची नजर लागता कामा नये.

एकतरी बहीण असावी असे प्रत्येकाला वाटते. 

तोंडावर भाडत असली तरी मनात माया असते. 

आई बाबा रागावले तरी पाठीराखी ती असते. सांभाळून घेते मला आणि अभ्यासात पण तेवढीच मदत करते. 

जरी असला लहान तोंडी मोठा घास माझ्यावर तिचा असतो धाक. 

सगळीकडे तिची दादागिरी आणि आई बाबांच्या मनावर तीची जादूगिरी. 

अशी माझी लाडकी ताई तिची आभाळभर माया. तिच्या प्रेमाचा भुकेला हा सदा तिचा भाऊराया.


तनिष सचिन शिरसाठ 

3 / B

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow