मराठी भाषा गौरव दिन २०२५
ही मायभुमी, ही जन्मभूमी , ही कर्मभूमी आमुची, महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी आमुची….
मराठी भाषा म्हटली की सर्व प्रथम आठवतात ते आपले थोर संत व साहितिक ज्यांच्या मुळे मराठी भाषा अजरामर झाली..
मराठीची थोरावी गाऊ मी किती…
अजरामर आहे माझी माय मराठी…..
आज २७ फेब्रुवारी, ज्येष्ठ लेखक वि. वा.शिरवडकर उर्फ कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
सालाबाद प्रमाने पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या प्रथमिक विभागात मराठी भाषा गौरव दिन दिमाखात साजरा करण्यात आला. सौ.मधुर कारंबेळकर ह्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली…त्यानंतर सौ. मोनाली आंबेकर यांनी राज्यागीत तसेच मराठी भाषा गीत गायन केलं. त्यानंतर ग्रंथदिंडी काढण्यात आली..
आजच्या ह्या दिवसाचे अवचित्य साधून संपूर्ण दिवस मराठी भाषेतच संभाषण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मराठी भाषेची थोरवी मुलांच्या मनात रुजावी हाच त्यामागचा उद्देश. ग्रंथदिंडी नंतर मराठी कवितांचे वाचन झाले व सौ. मधुर कारंबेळकर यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली.
मराठी लोक, मराठी वाणी,
अजरामर झाली अनेक मराठी गाणी…
मराठी लेखक,मराठी कवी,
गाऊ आज आपण मराठीची थोरवी….
कुसुमागराज, पु.लं मुळे,
भाषेची उंची वाढली…
छत्रपतींसारखी थोर माणसं
महाराष्ट्रासाठी लढली….
मराठी भाषेची गंमत
सांगून समजणार नाही…
भाषेतील ‘ळ’ ची महती
शिकल्या शिवाय उमागणार नाही….
जन्म जाहला महाराष्ट्रात,
नाते जुळले मराठीशी….
शपथ घेऊ आपण सर्व,
टिकवू थोरावी भाषेची…..
सौ. मधुर म. कारंबेळकर.